Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी आतंकवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याच्या बँक खात्याची माहिती भारताला देण्यास अमेरिकेचा नकार !
वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनोचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या बँक खात्यांची माहिती देण्यात अमेरिकेने नकार दिला आहे. पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या देशांचे नागरिकत्व आहे. सध्या तो अमेरिकेत रहात आहे. भारताने पन्नू आणि त्याच्या संघटनेला आतंकवादी घोषित केले आहे. अनेक प्रकरणात तो भारताला हवा आहे. या अनुषंगाने भारताने अमेरिकेकडे पन्नूला कह्यात देण्याची मागणी केली होती; मात्र अमेरिकेने ती नाकारली, तसेच त्याच्या बँक खात्यांची माहिती देण्याची मागणीही नाकारली आहे. यासाठी अमेरिकेतील स्थानिक कायद्यांचे कारण पुढे केले आहे.
१. १४ ऑगस्ट २०२० या दिवशी पंजाबच्या मोगा जिल्हाधिकारी कार्यालयावर कथित खलिस्तानी झेंडा फडकवण्यात आला होता.
२. गुरुपतवंत सिंह पन्नू याने त्या वेळी अशा प्रकारे खलिस्तानी झेंडा फडकावणार्याला अडीच सहस्र डॉलर (सुमारे २ लाख १२ सहस्र) देणार असे घोषित केले होते.
३. त्याला भुलून २ व्यक्तींनी हा गुन्हा केल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली.
४. या प्रकरणात भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अर्थात् नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एन्.आय.ए.ने) अमेरिकेकडे पन्नूचे बँक खाते आणि त्याचा भ्रमणभाष क्रमांक यांची माहिती मागितली होती.
५. ‘या गुन्ह्यासाठी अमेरिकी कायद्यात एका वर्षाहून अल्प शिक्षा आहे. त्यामुळे त्याची माहिती आम्ही देऊ शकत नाही’, अशी भूमिका अमेरिकी प्रशासनाने घेतली आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेची खलिस्तानी आतंकवाद्यांना फूस नाही, तर संपूर्ण पाठिंबा आहे, हेच यातून लक्षात येते ! अशा अमेरिकेचे नाक दाबण्यासाठी भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे ! |