डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ २०२४’ पुरस्कार जाहीर !
पुणे – आयुष्यभर प्रामाणिकपणे पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्या ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ २०२४’ हा १० डिसेंबर या दिवशी जाहीर झाला. यापूर्वी डॉ. गाडगीळ यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीसुद्धा ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंत ७ पुस्तके लिहली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय पुस्तकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.