दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलचे नियोजन पालटले; प्रवाशांचा गोंधळ !; बेस्‍टच्‍या चाकात अडकून मृत्‍यू !….

लोकलचे नियोजन पालटले; प्रवाशांचा गोंधळ !

ठाणे – ठाण्‍याहून सुटणार्‍या सायंकाळी ७.४५ च्‍या बदलापूर रेल्‍वेच्‍या ऐवजी मुंबई दिशेकडे जाणारी सायंकाळी ७.३५ ची गाडी लावल्‍याने प्रवाशांचा गोंधळ झाला. पालटलेल्‍या वेळापत्रकामुळे स्‍थानकावर पुष्‍कळ गर्दी जमली.


बेस्‍टच्‍या चाकात अडकून मृत्‍यू !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेस्‍ट बसच्‍या मागच्‍या चाकात अडकून एकाचा मृत्‍यू झाल्‍याचे समजते.


महिलेची ४२ लाख रुपयांची फसवणूक !

नवी मुंबई – सामाजिक माध्‍यमाद्वारे पैसे कमवण्‍याचे आमीष दाखवून एका महिलेची ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. संबंधित महिलेने तक्रार प्रविष्‍ट केल्‍यानंतर वाशी पोलीस ठाण्‍यात संबंधितांविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. ‘ऑनलाइन टास्‍क पूर्ण करा, भरपूर पैसे कमवा’, असे आमीष या महिलेला दाखवण्‍यात आले होते.

संपादकीय भूमिका : फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्‍याविना असे प्रकार थांबणार नाहीत !


२५ लाख ८५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक

पनवेल – ट्रेडिंग अ‍ॅपमध्‍ये खाते उघडून नफ्‍याचे आमीष दाखवून कामोठे येथील ६६ वर्षीय सेवानिवृत्त व्‍यक्‍तीची २५ लाख ८५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्‍यात आली. या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.