बांगलादेशातील परिस्‍थितीकडे लक्ष न दिल्‍यास दक्षिण आशियाई प्रदेशातील स्‍थिरता आणि शांतता धोक्‍यात येईल !

‘नोबेल शांतता’ पुरस्‍कार विजेते कैलाश सत्‍यार्थी यांची चेतावणी

नोबेल शांतता’ पुरस्‍कार विजेते कैलाश सत्‍यार्थी

मुंबई – बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांवर झालेली आक्रमणे आणि धार्मिक स्‍थळांची होणारी तोडफोड यांमुळे असंख्‍य लोक भयभीत झाले आहेत. त्‍यांच्‍या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्‍थिर परिस्‍थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्‍याचे परिणाम बांगलादेशासह अन्‍य देशांतही पसरतील. त्‍यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्‍थिरता आणि शांतता धोक्‍यात येईल, अशी चेतावणी ‘नोबेल शांतता’ पुरस्‍कार विजेते कैलाश सत्‍यार्थी यांनी दिला आहे.

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस यांना उद्देशून ते म्‍हणाले, ‘‘अल्‍पसंख्‍यांकांवरील दडपशाही आणि मानवी हक्‍कांचे उल्लंघन हे आपल्‍या सामूहिक विवेकावरील आक्रमण आहे. त्‍यामुळे कुठलाही विलंब न करता या पालटत्‍या परिस्‍थितीकडे तातडीने लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे.’’