भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांच्या मृतदेहावर दांड्याने मारल्याच्या खुणा !
पुणे – येथे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आधी अपहरण आणि त्यानंतर हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला. वाघ यांचे ९ डिसेंबरला शेवाळवाडी येथून अपहरण झाले होते. अद्याप गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही. आरोपींनी सतीश वाघ यांचा मृतदेह जंगलात फेकला होता. त्यांच्या शरिरावर दांड्याने मारल्याच्या खुणा असून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. वाघ यांची सकाळीच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.