हिंदु शौर्यदिनानिमित्त ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांचे आक्रमण !

निफाड (नाशिक) येथील घटना !

नाशिक – हिंदु शौर्यदिनानिमित्त ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणावर आक्रमण केल्याप्रकरणी मिझान शेख, आयान शेख, आयेश शाह, शारिक शाह आणि फहीम शेख यांच्या विरोधात पोलिसांनी ७ डिसेंबर या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (अशा धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !- संपादक) ६ डिसेंबर या दिवशी श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे उभा असलेला बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. तो शौर्यदिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे यासंदर्भात ‘इन्स्टाग्राम’वर एक पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. या प्रकरणी धर्मांधांनी नयन या हिंदु तरुणाला शिवीगाळ करत आक्रमण केले. त्यांनी त्याच्या घरावर दगडफेक केली. त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. ही घटना निफाड येथे घडली होती. हिंदु तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली.

 

  • हिंदूबहुल महाराष्ट्रातील हिंदू आणखी किती काळ अशी आक्रमणे झेलत रहाणार आहेत ? सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !
  • शौर्यदिन साजरा करणार्‍या हिंदूंना विरोध करायला हा भारत आहे कि पाकिस्तान ?