Death Threat VishnuShankar Jain : हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना ठार मारण्याची धमकी !

  • ‘एक्स’ खात्यावरून अधिवक्ता जैन यांचे छायाचित्र पोस्ट करत ‘मुसलमानांनो, त्याचा चेहरा ओळखा…’ असे आवाहन !

  • सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

उत्तरप्रदेशातील संभल प्रकरणी मिळाली अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना जिवे मारण्याची धमकी !

नवी देहली : उत्तरप्रदेशातील संभल येथील जामा मशीद पूर्वीचे हरिहर मंदिर असल्याच्या प्रकरणी न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे. या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

स्वत:ला ‘निधी झा’ असे लिहिणार्‍या @NidhiJhabihar या ‘एक्स’ खात्यावर अधिवक्ता जैन यांचे छायाचित्र पोस्ट करत ‘मुसलमानांनो, त्याचा चेहरा नीट ओळखा’, असे आवाहन करण्यात आले. यानंतर अधिवक्ता जैन यांनी संभल जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात या खात्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

@NidhiJhabihar या ‘एक्स’ खात्यावरून मिळाली धमकी !

वातावरण बिघडवणार्‍या कुणालाही सोडले जाणार नाही ! – पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई

पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई

संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई यांनी सांगितले की, सायबर पोलीस ठाण्यात ‘एक्स’ खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर गुन्हे पथक त्याचे अन्वेषण करत आहे. सध्या हे खाते कोण आणि कुठून चालवले जात आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. वातावरण बिघडवणार्‍या कुणालाही सोडले जाणार नाही.

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या मंदिरांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. ही धार्मिक स्थळे हिंदूंना परत मिळण्यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते धर्मांधांच्या डोळ्यांत खुपत असणार, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन समस्त हिंदु समाजाने हिंदुत्वनिष्ठ जैन यांच्या मागे खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक !