सांगलीत कॉपीमुक्त बोर्ड परीक्षेसाठी सभा
सांगली – इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे आणि परीक्षा कॉपीमुक्त अन् गैरप्रकार मुक्त करण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने शाळाप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन केले आहे. सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृह’ येथे १२ डिसेंबर या दिवशी सभा होईल. सकाळी जत, वाळवा, शिराळा, खानापूर आणि आटपाडी, दुपारी सांगली, मिरज, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ आणि कडेगाव यांची सभा होईल. कोल्हापूर विभागीय मंडळाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा होणार आहे.