चिन्मय कृष्णदास यांची सुटका, तसेच बांगलादेशी हिंदूंचे रक्षण यांसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीची हुपरी (कोल्हापूर) येथील आंदोलनात मागणी
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने ९ डिसेंबर या दिवशी नेताजी सुभाषचंद्र चौक, हुपरी येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) आंदोलनानंतर हुपरी नगर परिषेदेचे मुख्याधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निराक्षक गजानन सरगर यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजित सुतार, श्री. शिवाजी शिंगारे, श्री. शिवाजी मोटे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सोहम हुपरे, ‘वीर शिवा काशीद प्रतिष्ठान’चे श्री. निळकंठ माने, ‘चांदी असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ससे, भाजप युवा मोर्चाचे श्री. उमाजी तांबे, ‘दुर्गवेध प्रतिष्ठान’चे श्री. प्रवीण पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पट्टणकोडोली, रेंदाळ, तळंदगे, यळगूड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.