देखभाल रक्कम परत न केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर रहिवाशांचे धरणे आंदोलन !
पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील ‘प्रयेजा पुरम सह. सोसायटी’तील प्रकार
पुणे – सिंहगड रस्त्यावरील ‘प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या सभासदांकडून सोसायटी देखभालीसाठी घेतलेली रक्कम अनेकवेळा पाठपुरावा करूनही त्यांना बांधकाम व्यावसायिकाने परत केली नाही. त्या विरोधात सोसायटीच्या सभासदांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.
प्रयेजा प्रकल्पातील सदनिकांची पूर्ण रक्कम घेऊन प्रकल्पातील कामे पूर्ण केली नाहीत. सभासदांचा विश्वासघात केला आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही नोंद घेतली जात नाही. याविषयी सोसायटीच्या वतीने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली आहे. सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडे देखभाल शुल्कापोटी २८ लाख रुपये जमा आहेत. ही रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे अनेकवेळा सोसायटीतील रहिवाशांना विजेचे देयक भरता आलेले नाही. परिणामी वीज मीटर काढून नेण्यात आले, तसेच ‘लिफ्ट’ (उद़्वाहन यंत्र) बंद पडल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असा रहिवाशांचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकाअशा बांधकाम व्यावसायिकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |