सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांची सदिच्छा भेट !
नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) – चंपाषष्ठीच्या निमित्ताने नागपूरच्या कॉटन मार्केट येथील खंडोबा मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रसिद्ध आचारी (शेफ) श्री. विष्णु मनोहर यांनी या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी ग्रंथांची माहिती जाणून घेतली. धर्माचरण, साधना, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृृती, स्वसंरक्षण प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील ग्रंथ या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. प्रदर्शन लावण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभले. या ग्रंथप्रदर्शनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.