भोसरी (पुणे) येथे सासर्याचा सुनेवर पतीसमोर लैंगिक अत्याचार !
‘डेटिंग बेवसाईट’वरून वेश्याव्यवसाय करण्यास दबाव
भोसरी (पुणे) – पतीच्या संमतीने सासर्याने सुनेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिच्या नावाने ‘डेटिंग वेबसाईट’वर (ओळख वाढवण्यासाठीचे संकेतस्थळ) बनावट माहिती देऊन वेश्याव्यवसाय (देहविक्री) करण्यास भाग पाडले. हा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईमधील टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि सासरे या दोघांना अटक केली आहे.
पीडित महिलेचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. मागील २ वर्षांपासून तिचे सासरे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होते. यासाठी तिच्या पतीचीही संमती होती. संबंधित महिलेने वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिला. पती आणि सासरे यांनी तिला मारहाण केली अन् मुलासह घराबाहेर हाकलून दिले.
संपादकीय भूमिका :समाजाची नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, याचे उदाहरण ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |