हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवप्रतापदिनी जळगाव येथे १० ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन !
एकलग्न येथे पोवाड्यावर सजीव देखाव्याचे सादरीकरण !
जळगाव – येथे शिवप्रतापदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात १० ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ‘शिवप्रतापदिनाचा इतिहास आणि शौर्य जागृतीचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी एकलग्न येथे गावातील लहान मुलांनी अफझलखानवध प्रसंगाच्या पोवाड्यावर सजीव देखाव्याचे सादरीकरण केले.
एकलग्न येथे युवतींच्या ‘रणरागिणी’ शाखेची स्थापना !
या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवतींच्या रणरागिणी शाखेची स्थापना करण्यात आली. येथे देव, देश आणि धर्म यांविषयी जागृती, संघटन अन् रक्षण यांचे कार्य या शाखेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार गावातील रणरागिणींनी केला.