Yunus Planning Jihad Against India : बांगलादेश भारताविरुद्ध करत आहे जिहादची सिद्धता ! – साजिद तरार
|
नवी देहली – शेख हसीना यांच्या पलायनानंतर अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत. त्याच वेळी बांगलादेश सरकार भारताचा शत्रू पाकिस्तानशी जवळीक साधत आहे आणि शस्त्रेे खरेदी करत आहे. पाकच्या साहाय्याने भारतात जिहादी आतंकवाद पसरवण्याची योजना आखत आहे. या संदर्भात अमेरिकेत रहाणारे पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती आणि पाकिस्तानी प्रकरणांचे तज्ञ साजिद तरार यांनी भारताला सतर्क रहाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेजवळ ‘जिहाद पुकारणार’, अशा घोषणा दिल्या जात आहेत. भारतासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी पाकिस्तानकडे केवळ २५ सहस्र टन साखरेची मागणी केली नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचीही मागणी केली आहे.
“🚨Alert: Bangladesh’s Growing Threat to India! 🚨
Pakistani-origin American businessman, Sajid Tarar, has reveals that Bangladesh is preparing for J!h@d against India! 💥
What’s more alarming is that Bangladesh has procured a massive amount of explosives and ammunition from… pic.twitter.com/mITlRBf0UO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2024
साजिद तरार यांनी दिलेली माहिती
१. भारताच्या सीमेच्या दोन्ही बाजूंनी (पाकिस्तान आणि बांगलादेश) जिहादच्या घोषणा दिल्या जात असल्याने आतंकवादी कारवायांच्या विरोधात भारताला पूर्ण सिद्धता करावी लागेल आणि कठोर कारवाई करावी लागेल.
२. बांगलादेशाने पाकिस्तानकडून ४० टन आर्.डी.एक्स., २८ सहस्र उच्च तीव्रतेचे रॉकेट्स, रणगाड्यांचे २ सहस्र गोळे आणि ४० सहस्र तोफगोळे यांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
३. महंमद युनूस यांनी पाकिस्तानी लोकांसाठी बांगलादेशाच्या व्हिसाचे (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का) नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला व्हिसा मिळवण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागत असे. आता हा नियम रहित करण्यात आला आहे. यामुळे इस्लामी आतंकवाद्यांना सहजपणे बांगलादेशात प्रवेश करता येईल आणि नंतर सीमा ओलांडून भारतात प्रवेश करता येईल.
४. भारतातील काही लोक भूतकाळातील अनुभव आठवून खूप अस्वस्थ झाले आहेत. या लोकांचा असा विश्वास आहे की, बांगलादेश नॅशनल पार्टी वर्ष १९९१ ते १९९६ आणि पुन्हा वर्ष २००१ ते २००५ या काळात सत्तेत होती. या कार्यकाळात लष्कर-ए-तोयबा संघटनेचे आतंकवादी, मसूद अझहर आणि सज्जाद अफगाणी यांसारख्या आतंकवाद्यांनी बांगलादेश सीमेवरून भारतात प्रवेश केला होता आणि मुंबईवर आक्रमण केले होते. आतंकवादी डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा जे अमेरिकी होते, त्यांचेही बांगलादेशाशी जवळचे संबंध होते. डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांनी मुंबई आक्रमणासाठीची माहिती गोळा केली होती.
५. बांगलादेशाने पुकारलेल्या जिहादच्या अंतर्गत भारतातील काही लोक बांगलादेशाच्या वतीने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा देण्यास चालू करतील. या सर्व गोष्टींमागे पाकिस्तानची आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) ही गुप्तचर संस्था आहे.
संपादकीय भूमिका
|