TMC MLA HUMAYUN KABIR : बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संतापजनक घोषणा !
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर यांनी मुसलमानबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे २ एकर भूमीवर नवीन बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली आहे. ६ डिसेंबर २०२५ च्या आधी बाबरी मशीद बांधण्याचे काम चालू केले जाईल. या मशिदीसाठी मी १ कोटी रुपये दान देणार आहे, असे त्यांनी म्हटले.
TMC MLA Humayun Kabir: Outrageous announcement by Bengal’s ruling Trinamool Congress MLA to rebuild Babri Masjid!
It has now become necessary to ask, who was Babur to the Muslims of this country or to Humayun Kabir? Those who consider Babur their ancestor are given the… pic.twitter.com/YOfoLHdKuU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2024
कबीर पुढे म्हणाले की, बंगालमध्ये ३४ टक्के मुसलमान आहेत. त्यांना ताठ मानेने चालण्याची इच्छा आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मशिदीसाठी १०० जणांचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाया देशातील मुसलमानांचा किंवा हुमायूं कबीर यांचा बाबर कोण होता ?, असा प्रश्न विचारणे आता आवश्यक झाले आहे. बाबरला जे स्वतःचे वंशज मानत आहेत, त्यांना बहुसंख्य हिंदूंच्या देशात आमदार होण्याची संधी मिळते, हे हिंदूंना लज्जास्पद आहे ! |