५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा देवाची आवड असलेला बीळगी, जिल्‍हा बागलकोट (कर्नाटक) येथील चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि (वय ३ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि हा या पिढीतील एक आहे !

चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मार्गशीर्ष शुक्‍ल दशमी (१०.१२.२०२४) या दिवशी चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आजीच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

चि. पार्थ रेड्डी कुडकुंटि याला तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्‍म ते १ वर्ष 

सौ. शैलजा पाटील

१ अ. देवाची ओढ : ‘आम्‍ही भ्रमणभाषवर श्रीरामाचे गाणे लावल्‍यावर पार्थ झोपत असे. तो नेहमीच मुद्रा करून झोपत असे. त्‍याला कडेवर घेऊन देवाचे गाणे आणि श्‍लोक म्‍हटल्‍यावर तो पुष्‍कळ आनंदाने ऐकत असे. पार्थ श्रीकृष्‍णाचे चित्र पाहून हसत असे.

१ आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव : तो गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पहाताच आनंदाने हसत असे आणि तो ते छायाचित्र हातात घेत असे. तो परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे छायाचित्र घरात ज्‍या ठिकाणी ठेवले आहे, तिथेच रांगत जात असे आणि ते छायाचित्र एकाग्रतेने पहात असे.

२. वय १ ते ३ वर्षे

२ अ. लाघवी : पार्थला पाहिल्‍यावर प्रत्‍येक जण त्‍याच्‍याशी अतिशय प्रेमाने बोलतो. आमचेे नातेवाईक किंवा ओळखीच्‍या व्‍यक्‍ती यांनी आम्‍हाला भ्रमणभाष केल्‍यास ते आम्‍हाला ‘पार्थला भ्रमणभाष द्या’, असे सांगतात आणि आधी त्‍याच्‍याशी बोलतात.

२ आ. पार्थ सगळ्‍यांशी अतिशय प्रेमाने बोलतो.

२ इ. देवाची आवड  

१. तो प्रत्‍येक कृती (स्नान आणि जेवण इत्‍यादी) करण्‍यापूर्वी श्‍लोक म्‍हणतो.

२. त्‍याची मारुतीवर अपार भक्‍ती आहे. तो हनुमानचालिसा अचूक म्‍हणतो.

३. त्‍याची प्रकृती बरी नसल्‍यास तो आम्‍हाला भ्रमणभाषवर ‘श्रीरामरक्षास्‍तोत्र’ लावायला सांगतो आणि ते ऐकत तो झोपतो. त्‍यानंतर तो ‘मला आता बरे वाटत आहे’, असे सांगतो.

२ ई. आम्‍ही भ्रमणभाषवर प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने लावल्‍यावर तो आनंदाने ऐकतो.

२ उ. पार्थ बोलत असतांना त्‍याच्‍या बोलण्‍यातून चैतन्‍य जाणवते. पार्थचे बोलणे ऐकतांना इतरांना आनंद होतो. ‘त्‍याचे बोलणे ऐकतच रहावे’, असे सर्वांना वाटते.

२ ऊ. ‘पार्थचा जन्‍म झाल्‍यापासून घरात पुष्‍कळ शांती आणि समाधान वाटत आहे’, असे त्‍याचे आजोबा सांगतात.

– सौ. शैलजा पाटील (चि. पार्थची आजी (आईची आई), बागलकोट, कर्नाटक. (८.७.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.