सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या चंडीयागाच्या वेळी तिन्ही गुरूंचे अवतारत्व अनुभवता येऊन शारीरिक त्रास न्यून होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त २८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग करण्यात आला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, तसेच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत अन् लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशांच्या पूर्तीसाठी हा याग करण्यात आला. त्या वेळी मी यज्ञाला उपस्थित होते. मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. यज्ञस्थळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या उपस्थित होत्या. पहिले २ दिवस पुरोहितांनी यज्ञात दिलेल्या आहुतींमधून सगळीकडे तेजोवलय निर्माण झाले आहे’, असे मला दिसत होते.
२. तिसर्या दिवशी ‘यज्ञात दिलेली आहुती गुरुदेवांच्या चरणकमली रुजू होऊन तेथे महाशक्ती निर्माण झाली आहे’, असे मला दिसत होते.
३. यज्ञस्थळी गुरुदेवांनी सूक्ष्मातून प्रकट होऊन विराट रूपात मला दर्शन दिले. त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ‘श्री लक्ष्मी’ असून त्याही विराट रूपात आहेत’, असे मला जाणवले.
अशा प्रकारे तिन्ही गुरूंचे अवतारत्व मला अनुभवता आले. तेव्हापासून मला होणारे शारीरिक त्रास न्यून होऊन माझे मन आनंदी झाले आहे. या अनुभूतींबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजली दीपक दीक्षित, डोंबिवली, जि. ठाणे. (६.६.२०२४)
|