चिन्‍मय कृष्‍णदास यांच्‍या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्‍या रक्षणासाठी सरकारने हस्‍तक्षेप करावा !

पारगाव (सालू मालू) येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या शाखेच्‍या वतीने निवेदनाद्वारे मागणी !

उजवीकडून पहिले दौंड तालुक्‍याचे तहसीलदार श्री. अरुण शेलार यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

पारगाव (सालू मालू) (जिल्‍हा पुणे), ९ डिसेंबर (वार्ता.) – येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बांगलादेशातील इस्‍कॉनचे स्‍वामी चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांच्‍या अन्‍याय्‍य अटकेविरोधात त्‍वरित हस्‍तक्षेप करण्‍याची आणि हिंदु अल्‍पसंख्‍यांकांवरील अन्‍याय रोखण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तसेच जिल्‍हाधिकारी, पुणे यांना ५ डिसेंबर या दिवशी दौंड तालुका तहसीलदार श्री. अरुण शेलार यांच्‍या वतीने देण्‍यात आले. या वेळी पारगाव शाखेतील १० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.