पुणे येथे मद्यपी चालकाने महिला पोलिसाला चिरडले !
पुणे – येथील मिल्स परिसरातील पबमधून बाहेर पडलेल्या एका भरधाव वाहनाने महिला पोलिसाला चिरडल्याची घटना ८ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. नायडू लेन (‘आर्.टी.ओ.’ कार्यालयाजवळ) ‘रुबी हॉस्पिटल’कडून ‘आर्.टी.ओ.’च्या दिशेने जातांना हा प्रकार घडला आहे. मद्याच्या नशेत चालकाने नाकाबंदी करणार्या दीपमाला राजू नायर या महिला पोलिसाला चिरडले. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गंभीर घायाळ झालेल्या या महिला कर्मचार्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.