संपादकीय : हिंदुद्वेषी इल्तिजा मुफ्ती !
फारूक अब्दुल्ला, त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सध्या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी ओमर अब्दुल्ला आहेत. फारूक अब्दुल्ला अन् मेहबूबा मुफ्ती यांच्या घराण्यात हिंदुत्व, हिंदू आणि भारत यांविषयी कायम तुच्छतेने बोलले जाते, तसेच काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांनी कायम पाकिस्तानी आतंकवादी आणि मुसलमान यांची बाजू घेऊन हिंदूंवरील अत्याचारांचे समर्थन केले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर हळूहळू या गोष्टी अल्प होत आहेत; मात्र या दोन्ही घराण्यांतील मंडळींमध्ये अजूनही हिंदुद्वेषाची कावीळ तशीच आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांनी म्हटले आहे की, हिंदुत्व हा एक आजार आहे, ज्यामुळे लाखो भारतीय आजारी आहेत. हे देवाच्या नावालाही कलंकित करणारे आहे. ‘जय श्रीराम’चा नारा आता रामराज्याचा राहिला नाही. ‘मॉब लिंचिंग’चा वापर केला जातो. ६ डिसेंबरला एक कथित व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्याने या गोष्टी सांगितल्या. असा दावा केला जात आहे की, काही लोक अल्पवयीन मुसलमान मुलांना मारहाण करतांना दिसत आहेत. हे लोक मुलांशी क्रूरपणे वागतात आणि त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणायला भाग पाडत असल्याचा आरोप आहे. इल्तिजा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता; मात्र नंतर त्यांनी तो काढून टाकला.
यंदाच्या वर्षी मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यांनी त्यांची मुलगी इल्तिजा हिला निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते; मात्र इल्तिजा तेथून पहिली निवडणूक हरली आहे. अशा हिंदुद्वेषी नेत्यांना कोण निवडून देणार ? हा प्रश्न आहे. हिंदुत्व ही वर्ष १९४० च्या दशकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रसारित केलेली द्वेषाची विचारसरणी असल्याचे सांगत इल्तिजा यांनी हिंदुत्वावर टीका केली. इल्तिजा यांनी टीका केल्यानंतर भाजपचे नेते रविंदर रैना म्हणाले की, पीडीपी नेत्याने हिंदु धर्मासाठी अत्यंत अवमानास्पद भाषा वापरली आहे. त्यांनी क्षमा मागितली पाहिजे. अशा प्रकारची भाषा वापरली जाऊ नये. राजकारणात मतभेद असू शकतात; परंतु अवमानास्पद भाषा वापरली जाऊ नये.
इल्तिजा यांचे हिंदूंवरील अत्याचारांविषयी मौन !
संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करण्याचा ज्यांनी चंग बांधला आहे, असे धर्मांध मुसलमानच हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यावर अत्याचार करत आहेत. याचे उत्तम उदाहरण बांगलादेशातील हिंदूंविषयी देता येईल. बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंना शोधून शोधून ठार मारले जात आहे, तेथे हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्या संपत्तीची लूट केली जात आहे. बांगलादेश असो वा भारत या देशांतील अनेक राज्यांत हिंदूंनी इस्लाम पंथांत धर्मांतर करण्यासाठी हिंदूंविषयी ‘मॉब लिंचिंग’च्या घटना घडलेल्या आहेत. असे असतांना याविषयी इल्तिजा मूग गिळून गप्प बसतात. महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा डंका बजावणारे पुरोगामी, साम्यवादी आणि नास्तिकवादी मंडळी एखाद्या मुसलमानावर अत्याचार झाला, तर लगेच मुसलमानांच्या बाजूने उभे राहून ‘देशात मुसलमानांना धोका निर्माण झाला आहे’, अशी आवई उठवतात; मात्र हिंदूंवर आतापर्यंत अनन्वित अत्याचार झालेले असतांनाही त्याविषयी ते मूग गिळून गप्प बसतात. इल्तिजाच्या विधानाचे ते समर्थनच करतील, यात शंका नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी ही हिंदु राष्ट्रावर आधारित आहे. यामध्ये सर्व समाजातील लोकांच्या प्रगतीचा विचार करण्यात आला आहे; मात्र हे मोहनदास गांधी, पंडित नेहरू यांना मान्य नसल्याने त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन करून पाकिस्तानची निर्मिती करून देशाची फाळणी केली. फाळणी होत असतांना आणि फाळणी झाल्यानंतरही भारत अन् पाकिस्तान येथे हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत, हे इल्तिजा विसरल्या आहेत का ?
हिंदुद्वेष्ट्यांना भारतातून हाकलून लावण्याची आवश्यकता !
पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या वर्ष २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्ष २०१८ मध्ये भाजपने त्यांचा पाठिंबा काढला. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० रहित करून जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेतला आणि जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले, तेव्हा कायदा अन् सुव्यवस्थेसाठी मेहबूबा मुफ्ती यांना अनेक काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अशा कुटुंबातील इल्तिजासारख्या व्यक्तीकडून देशप्रेम कधीतरी व्यक्त होईल का ? ‘देशात हिंदूंची मंदिरे आणि धार्मिक मिरवणुका यांच्यावर ‘अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत मशिदींतून आक्रमणे होतात, तेव्हा इल्तिजा मुफ्ती किंवा त्यांच्यासारखे हिंदुद्वेषी राजकीय नेते तोंड उघडत नाहीत आणि वैध मार्गाने हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या, तर त्यांची पोटदुखी चालू होते. भारतातील नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा कुठे द्याव्यात आणि देऊ नयेत’, हे हिंदूंना ठाऊक आहे. हिंदुस्थानात हिंदूंनी काय करायला हवे आणि काय करू नये ? हे इल्तिजा यांनी सांगू नये.
आतापर्यंत भारतात ज्या ज्या शहरांत दंगली झाल्या, तेथे हिंदूंना मार खावा लागला आहे, तसेच या दंगलींमध्ये हिंदूंची घरे आणि त्यांची संपत्ती यांची नासधूस करण्यात आली आहे. आतंकवाद्यांच्या धमक्यांमुळे काश्मीरमधून ४ लाख ५० सहस्र हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. जे राहिले, त्या हिंदूंचा आतंकवाद्यांनी नरसंहार केला. हिंदूंवरील अत्याचारांच्या अनेक घटना आजही घडत आहेत. असे असतांना याविषयी इल्तिजा मुफ्ती नव्हे, तर अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेता नसरुद्दीन शहा, आमीरखान, सलमान खान, शाहरुख खान, प्रकाश राज आणि कमल हसन ही मंडळी काहीच बोलत नाहीत. स्वरा भास्कर हिने तर हिंदुत्वाची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केली होती. अरब राष्ट्रांमध्ये कुणी इस्लामच्या विरोधात वक्तव्य केल्यास, त्याला लगेच चाबकाचे फटके, चटके देणे, दगड मारणे अथवा फाशीची शिक्षा केली जाते; मात्र भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने देशात कुणीही उठून सर्वधर्मसमभावाची भाषा बोलून केवळ हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा र्हास करण्याचे षड्यंत्र देशातील इल्तिजासारखी पुरोगामी मंडळी रचत आहेत. त्यामुळे जे हिंदु धर्माच्या विरोधात सतत गरळ ओकत असतात, अशा मंडळींना देशातून हाकलून लावण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारनेच आत इल्तिजा मुफ्ती यांच्यासारख्या हिंदुद्वेष्ट्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार न दिसणारे आणि हिंदु धर्माविषयी गरळओक करणारे भारतात रहाण्यास अपात्रच ! |