निधन वार्ता : प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक शंकर गो. पांडे
पुसद (जिल्हा यवतमाळ) – प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वरक्षणाच्या संदर्भात अभ्यासपूर्ण लेखन करून हिंदूंना जागृत करणारे शंकर गो. पांडे (पुसद) (वय ७२ वर्षे) यांचे ९ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, १ मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘दिवंगत शंकर पांडे यांना सद़्गती मिळो’, अशी सनातन परिवाराकडून श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !