Donald Trump On Birthright Citizenship : जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व देणारा कायदा पालटणार ! – डॉनल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत वैध कागदपत्रांविना रहाणार्‍या पालकांच्या पोटी जन्मलेल्या पाल्यांना देशाचे ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ बहाल करणार्‍या कायद्यात पालट करणार असल्याची घोषणा केली आहे. ते ‘एन्.बी.सी.’ वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते. ‘माझ्या कार्यकाळात बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्या सर्व स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे ध्येय आहे’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना हुसकावून लावण्यासाठी ट्रम्प जशी पावले उचलत आहेत, त्याप्रमाणे भारतीय शासनकर्तेही बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांना हटवण्यासाठी पावले उचलणार का ? – संपादक)