Pravin Togadia : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद
बदायू (उत्तरप्रदेश) – पॅलेस्टाईनने ३०० इस्रायली लोकांना मारले आणि इस्रायलने त्यांच्या ४२ सहस्र लोकांना मारले. त्यांनी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये घुसून त्यांना मारले. जर बांगलादेश सरकारशी वाद असेल, तर हिंदूंना का मारले जात आहे ? बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे. भारतात असे सरकार असले पाहिजे, जे हिंदूंचे रक्षण करू शकेल आणि योग्य उत्तरे देऊ शकेल, असे विधान आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी येथे केले. ते सध्या उत्तरप्रदेशाच्या दौर्यावर आहेत.
डॉ. तोगडिया पुढे म्हणाले की, ३०० वर्षांपूर्वी मोगलांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. एक थोर विद्वान सीताराम गोयल यांनी पुस्तक प्रसिद्ध करून भारतात जिल्हानिहाय मंदिरे पाडून किती मशिदी बांधल्या आहेत, याची सूची दिली आहे. अशा २० सहस्र मंदिरांची सूची आहे. ही सूची मी वाचली आहे.