दिव्‍यांग विद्यार्थ्‍यांचे कला-गुण विकसित करण्‍यासाठी प्रयत्न करावेत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्‍हाधिकारी

प्रदर्शन पाहताना जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, ८ डिसेंबर (वार्ता.) – दिव्‍यांगासाठीचे शासनाचे धोरण सकारात्‍मक आणि सर्वसमावेशक आहे. त्‍यांनी न्‍यूनगंड न ठेवता समाजात आत्‍मविश्‍वासाने वावरावे. त्‍यांची बुद्धीमत्ता आणि कला-गुण विकसित करण्‍यासाठी पालक अन् शाळा यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी येथे केले. ‘जागतिक दिव्‍यांगदिना’निमित्त दिव्‍यांग विद्यार्थ्‍यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम ‘डेक्‍कन मॅन्‍युफॅक्चुरर्स’मध्‍ये असोसिएशनच्‍या सभागृहात पार पडला. त्‍या वेळी ते बोलत होते.