संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधीवर प्रक्षाळपूजा उत्‍साहात झाली !

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधीवर लिंबू आणि पाणी घालून दर्शन घेतांना भाविक

आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा ७२८ वा समाधी सोहळा नुकताच मोठ्या उत्‍साही वातावरणात साजरा झाला. कार्तिकी यात्रेमध्‍ये लाखो भाविकांनी संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधीचे दर्शन घेतले. त्‍यानिमित्ताने शिणवटा काढण्‍यासाठी कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्‍याची परंपरा आहे. माऊलींच्‍या समाधीवर गरम पाणी, तसेच दह्यादुधाने स्नान घालण्‍यात आले आणि आयुर्वेदाचा काढाही देण्‍यात आला. ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर समाधीला चोळून दर्शन घेत होते. योग्‍य नियोजन केल्‍याने अधिकाधिक भाविक आणि आळंदीकर ग्रामस्‍थ यांनी प्रक्षाळपूजेचा लाभ घेतला असल्‍याचे मंदिर समितीचे व्‍यवस्‍थापक श्री. ज्ञानेश्‍वर वीर यांनी सांगितले आहे.