पुणे येथील वडाचीवाडी परिसरात १२ सहस्र लिटर गावठी मद्य जप्त !
दोघांवर गुन्हा नोंद !
पुणे – कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वडाचीवाडी परिसरातील गावठी मद्य (दारू) सिद्ध करणार्या भट्टीवर काळेपडळ पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी जगदीश प्रजापती आणि गुलाब रजपूत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत गावठी मद्य सिद्ध करण्यासाठी लागणारे १२ सहस्र लिटर रसायन, ४ सहस्र ३४० लिटर गावठी मद्य असा ९ लाख २७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.