Netherland Blast : हेग (नेदरलँड्स) येथील इमारतीत झालेल्या स्फोटात ५ जण ठार
हेग (नेदरलँड्स) – येथे एका निवासी इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगार्याखाली लोक दबले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर इमारतीला आग लागली. नेदरलँडच्या अन्वेषण यंत्रणांनी सांगितले की, स्फोट आणि आग यांमुळे ५ सदनिका यांची हानी झाली.