छत्रपती शिवरायांनी धर्मशत्रूला नरकात धाडले तो दिवस, म्हणजे शिवप्रतापदिन !
‘मै दीनदार बुत्शिकन मै दीनदार कुफ्रशिकन ।’ (मी काफिरांची हत्या आणि मूर्तींचा विध्वंस करून धर्माचे पालन करीन !), असे म्हणणारा तो आतंकवादी ! तुळजापूरच्या आई भवानीच्या मूर्तीवर घाव घालणारा आणि ज्या मंदिरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणी, प्रत्यक्ष आद्यशंकराचार्य, संतश्रेष्ठ ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा यांनी माथा टेकवला, त्या समस्त वारकर्यांच्या माहेरातील, म्हणजे पंढरीतील विठ्ठल मंदिरात गोमातेचे रक्त सांडणार्या आणि परततांना ते मंदिर पाडायची प्रतिज्ञा करणार्या त्या धर्मशत्रूला आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी नरकात धाडले ! हाच तो शिवप्रतापदिन ! छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांचे यथार्थ वर्णन ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’, म्हणजे म्लेंच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेले’, असे केलेले आहे. ते आपल्या हिंदूंचे तारणहार प्रियतम छत्रपती शिवराय त्यांना आजच्या दिवशी अत्यंत कृतज्ञतापूर्ण अंतःकरणाने शतवार वंदन करूया !
– गीता चारुचंद्र उपासनी, पुणे.