‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी व्हा !
साधक, वाचक, हितचिंतक आणि संशोधक यांना नम्र विनंती !
सध्या अनेक जण संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे वर्ष २०१४ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्माचे महत्त्व सांगण्यासाठी वैज्ञानिक स्तरावर संशोधनकार्य केले जात आहे. आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. या संशोधन कार्याची व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा पुढे देत आहोत.
१. संशोधन कार्याची व्याप्ती
यामध्ये हिंदु धर्मातील आचार, यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण आदी धार्मिक कृती; देश-विदेशांतील तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थाने आणि संतांची ऐतिहासिक स्थळे, सात्त्विक संगीत, नृत्य, वाद्यवादन आदी कलांच्या संदर्भात केले जाणारे विविधांगी संशोधन अंतर्भूत आहे.
२. संशोधन कार्याचे वैशिष्ट्य
या संशोधनाला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म-परीक्षणाची जोड देऊन विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धीजीवी समाजावर अध्यात्माचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होते.
३. अखिल मानवजातीपर्यंत संशोधनकार्य पोचवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !
१ – २ वर्षांत महाभीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. त्यापूर्वीच अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवायचे आहे. त्यामुळे गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात विविध सेवांसाठी मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता आहे. आपण आपली आवड आणि कौशल्य यांनुसार पुढील एखादी सेवा शिकू शकता. संशोधनाशी संबंधित सेवा करणार्यांना विविध सेवांतून अध्यात्मजगताची अभिनव ओळख होईल, तसेच ज्ञानाचा एक निराळा आनंदही अनुभवायला मिळेल. संशोधन कार्याच्या अंतर्गत पुढील सेवा उपलब्ध आहेत.
४. संशोधन कार्याशी संबंधित विविध सेवा
अ. संशोधनात्मक प्रयोगांची संकल्पना सिद्ध करणे (Experiment Design), प्रयोगांशी संबंधित समन्वय करणे (Experiment coordination) आणि प्रत्यक्ष प्रयोग करणे (Conducting Experiment)
आ. ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’, ‘पी.आय.पी.’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) आणि ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (Bio-well GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे चाचण्या करणे
इ. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांवर आधारित संशोधनात्मक लेख लिहिणे आणि त्यांचे संकलन करणे
ई. संशोधनासाठी छायाचित्रे काढणे, त्यांचे वर्गीकरण करून ते संगणकात संरक्षित करणे
उ. आध्यात्मिक संशोधनावर आधारित ग्रंथांशी संबंधित सेवा
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
५. वरील सेवांसाठी आवश्यक कौशल्य
वैज्ञानिक संशोधनाची आवड असावी. संगणकावर मराठी अन् इंग्रजी टंकलेखन करता यावे. मराठी आणि इंग्रजी भाषेचे व्याकरण अन् शब्दरचना यांचे ज्ञान असावे.
वरील सेवा शिकून त्या करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती mav.research2014@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.
नाविन्यपूर्ण अशा वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !
|