Iskcon Temple Attack : ढाका (बांगलादेश) येथे धर्मांध मुसलमानांनी इस्कॉन मंदिराला लावली आग
ढाका (बांगलादेश) – येथील नमहट्टा भागात असलेल्या इस्कॉन मंदिरावर ६ डिसेंबरच्या रात्री उशिरा धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करून आग लावण्यात आली. यात श्री लक्ष्मी-नारायण यांची मूर्ती आणि इतर धार्मिक वस्त्रे पूर्णपणे जळून राख झाले.
🚨ISKCON Temple Attack: Fanatic Mu$|!m$ set fire to ISKCON Temple in Dhaka, Bangladesh
👉The stance of “Ek hain, toh safe hain!” (If united, we are safe) should not just be limited to #Hindus in #India but should extend to Hindus worldwide! To achieve this, the Indian government… pic.twitter.com/mCD6YjVuFx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2024
रात्री २ ते ३ च्या सुमारास मंदिराच्या पाठीमागील छताचे पत्रे काढून मंदिरात पेट्रोल ओतून ही आग लावण्यात आली. इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी ढाका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर धर्मांध मुसलमानांनी हे मंदिर बलपूर्वक बंद पाडले होते.
या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतांना कोलकाता येथील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले की, हे आक्रमण बांगलादेशातील हिंदूंची स्थिती दर्शवतो. भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच त्यांनी मंदिराच्या जाळपोळीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
संपादकीय भूमिका‘एक हैं तो सेफ हैं’ (संघटित राहिलो, तर सुरक्षित राहू) अशी स्थिती केवळ भारतातील हिंदूंची नाही, तर जगभरातील हिंदूंची झाली पाहिजे. यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन बांगलादेशासह जगभरातील हिंदूंना ‘सेफ’ (सुरक्षित) केले पाहिजे ! |