MP School Majar : सिहोर (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार : हिंदु संघटनांचा विरोध !
(मजार म्हणजे इस्लामी फकिराचे थडगे)
सिहोर (मध्यप्रदेश) – येथील एका शाळेतील मजारीला हिंदु संघटनांनी विरोध केला आहे. मजार असल्यामुळे लोक भूतबाधा दूर करण्यासाठी शाळेच्या आवारात येतात. तसेच येणार्या लोकांकडून शाळेत येणार्या मुलींची छेड काढली जाते, असा आरोप आहे. हिंदु संघटना आणि ‘अभाविप’ यांनी शाळेतील ही मजार हटवण्याची मागणी केली आहे. (शाळेच्या आवारातील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि शाळेचे पावित्र्य जपण्यासाठी मध्यप्रदेशातील भाजप सरकारने या प्रकरणी वेळीच योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
१. कथाकार मोहित पाठक म्हणाले की, शाळा हे विद्यादानाचे ठिकाण आहे; मात्र येथे अंधश्रद्धा पसरवली जात आहे. येथे ‘लँड जिहाद’ होत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असतांना लोक येथे भूतबाधा काढण्यासाठी आणि चादर चढवण्यासाठी येतात. ही मजार शाळेच्या आवारातून हटवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
२. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जैन यांनी सांगितले की, त्यांनी शाळेतील मजार हटवण्याविषयी दीड वर्षापूर्वी प्रशासनाकडे अर्ज केला होता; मात्र त्याविषयी अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकासरकारी शाळेच्या आवारात मजार कशी बांधली जाते ? अन्य वेळी शाळेत गीता शिकवण्यास विरोध करणार्या निधर्मीवाद्यांना शाळेच्या आवारात मजार चालते का ? |