पोलीस भरतीसाठी साहाय्य करण्याचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार !
पुणे – पोलीस भरतीसाठी साहाय्य करण्याचे आमीष दाखवून स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्या एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. २३ वर्षीय पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. तक्रारीअन्वये पोलिसांनी सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करून तिला कह्यात घेतले आहे. पीडित तरुणी काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची सिद्धता करत कात्रज परिसरात रहात होती. आरोपीच्या घरी खानावळ असल्याने ती प्रतिदिन त्यांच्याकडून जेवणाचा डबा नेत असे. यातूनच त्या दोघांची ओळख झाली होती. आरोपीने वर्ष २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तरुणीसमवेत शारीरिक संबंध ठेवले होते. मागील काही दिवसांपासून तो तरुणीला मारहाण करून तिचे जीवन उद़्ध्वस्त करून टाकण्याची धमकी देत होता. या सर्व त्रासाला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे. पोलीस या घटनेचे अधिक अन्वेषण करत आहेत. (साहाय्याच्या नावाखाली गैरफायदा घेणार्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि मनोबल वाढवण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – संपादक)