शिक्रापूर (पुणे) येथे कत्तलीसाठी नेलेल्या ९ वासरांची सुटका !
बजरंग दलाच्या माहितीवरून कारवाई
शिक्रापूर (जिल्हा पुणे) – कत्तलीसाठी वासरे एका टेंपोतून चालली असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांना दिली. (गोरक्षक किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना मिळत असलेली गोतस्करीची माहिती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टेंपो तळेगाव ढमढेरे येथून कह्यात घेतला आणि ९ वासरांचा जीव वाचवला. संबंधित वासरे लोणीकंद येथील गोशाळेत नेण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र काळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा नोंद केला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता यातून लक्षात येते. – संपादक)