एखाद्याच्‍या प्रारब्‍धात दुःख असेल, तर त्‍यासाठी त्‍याला इतरांनी साहाय्‍य करणे आध्‍यात्मिकदृष्‍ट्या योग्‍य असणे

१. सामान्‍य मनुष्‍य, धर्माचरण करणारा मनुष्‍य, साधना करणारा मनुष्‍य आणि धर्माचरण अन् साधना करणारा मनुष्‍य यांना होणार्‍या साहाय्‍यांची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये ! 


२. धर्माचरण आणि साधना यांच्‍या प्रकारानुसार त्‍यांच्‍या दुःखात कोणी साहाय्‍य करावे ?

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३. ज्ञानाचे सार  

३ अ. ‘व्‍यक्‍ती कोण आहे ?’ हा घटक महत्त्वाचा असणे : ‘व्‍यक्‍ती कोण आहे ?’, यानुसार तिला मिळणार्‍या साहाय्‍याचे प्रमाण, स्‍वरूप आणि ‘कोणी साहाय्‍य करणे अपेक्षित आहे ?’, हे घटक वरील ज्ञानावरून सुस्‍पष्‍ट होते.

३ आ. ‘व्‍यक्‍तीला कोण साहाय्‍य करते ?’ हा घटक महत्त्वाचा असणे : धर्माचरण आणि साधना करणार्‍या व्‍यक्‍तींच्‍या ‘धर्माचरण अन् साधना यांचे स्‍वरूप, प्रकार आणि प्रमाण यांनुसार त्‍यांना कोणी, किती अन् कोणत्‍या स्‍तरावर साहाय्‍य करायचे ?’,  हे घटक वरील ज्ञानावरून सुस्‍पष्‍ट होतात.

३ इ. व्‍यक्‍तीच्‍या आध्‍यात्मिक पातळीपेक्षा ती करत असलेले धर्माचरण आणि साधना यांच्‍या प्रमाणावर तिला दुःखात  मिळणारे साहाय्‍य अवलंबून असणे : वरील ज्ञानावरून हे सिद्ध होते की, साधना करणार्‍या एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या प्रारब्‍धात दुःख असेल, तर त्‍यासाठी तिला इतरांनी साहाय्‍य करणे योग्‍य ठरते. हे व्‍यक्‍तीच्‍या पातळीवर अवलंबून नसून त्‍याने केलेले धर्माचरण आणि साधना या दोन्‍ही घटकांच्‍या संयोगावर अधिक अवलंबून आहे.

४. कृतज्ञता 

‘श्री गुरूंच्‍या कृपेमुळे दुःख भोगणार्‍या आणि त्‍यांना साहाय्‍य करणार्‍या विविध व्‍यक्‍तींच्‍या गुणवैशिष्‍ट्यांची ज्ञानमय सूत्रे उमजली’, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक