वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील उदय प्रताप महाविद्यालयात नमाजपठणावरून वाद !
वाराणसी – येथील उदय प्रताप (युपी) महाविद्यालयात नमाजपठण करण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला. महाविद्यालयात नमाजपठण करण्याला विरोध करणार्या विद्यार्थ्यांचा एक गट महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोचला आणि तेथे घोषणाबाजी चालू केली. ‘महाविद्यालयाच्या आवारात नमाजपठण करू देणार नाही’, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांचे अडथळे (बॅरिकेड्स) तोडून मुख्य प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न केला. (हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि साम्यवादी यांना महाविद्यालयासारख्या विद्यादेवतेच्या मंदिरात पूजा-पाठ चालत नाही; मात्र नमाजपठण केलेले चालते, हे लक्षात घ्या! – संपादक) २ दिवसांपूर्वी नमाजपठणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसाचे पठण करत मशिदीला विरोध केला होता.