सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहाणार्या पुणे जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
५ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ब्रह्मोत्सवासाठी जातांना आणि प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना पुणे जिल्ह्यातील काही साधकांना आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आता आपण साधकांना आलेल्या अनुभूतींचा उर्वरित भाग पाहूया.
(भाग ५)
याच्या आधीचा लेख (भाग ४) वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/860690.html
१. श्रीमती वत्सला विजय व्यवहारे
अ. ‘मी घरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहात होते. तेव्हा पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत ‘मी घरी आहे’, असे मला वाटतच नव्हते. ‘मी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळीच बसलेे आहे आणि प्रत्यक्षात सर्व अनुभवत आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी माझी सतत भावजागृती होत होती.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गुरुदेवांच्या चरणांवर मोगर्याची फुले अर्पण करत असतांना ‘मी स्वतः ती फुले गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे’, असे मला वाटले.
इ. कार्यक्रम पहात असतांना मला देह आणि स्थळ-काळ यांचे भान नव्हते. गुरुदेव ज्या रथात बसले होते, ‘तो रथ मीच ओढत आहे’, असे मला वाटत होते. ‘कार्यक्रमातील प्रत्येक पथकातील प्रत्येक साधकाच्या जागी मीच आहे. मीच टाळ वाजवत चालत आहे. मीच हातात झेंडा घेतला आहे आणि माझ्या डोक्यावर कलश आहे’, असे मी सतत अनुभवत होते.
ई. माझी दृष्टी अधू झाल्याने मला ‘ड्रोन’च्या साहाय्याने होणारी पुष्पवृष्टी दिसली नाही. तेव्हा ‘मी वेगवेगळ्या रंगांची फुले हातांत घेऊन गुरुदेवांच्या मस्तकावर अभिषेक करत आहे’, असे मला वाटत होते.
उ. प्रक्षेपणाच्या वेळी रथाचे दर्शन जवळून दाखवत होते, तेव्हा ‘रथाच्या एका कोपर्यात मी छोटे रूप घेऊन बसलेले आहे. मला सर्व चैतन्य मिळत आहे आणि मी पुष्कळ आनंदात आहे’, असे मला सतत वाटत होते.’
२. सौ. जयश्री माणिकपुरे
अ. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी मी वर्ध्याला रहात होते. वर्ध्याहून गोव्याला जाण्याचा व्ययही पुष्कळ होता. तेव्हा गुरुदेव मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे.’ मला हे स्वीकारतांना पुष्कळ संघर्ष होत होता; म्हणून मी देवाला पुष्कळ आळवले. त्यानंतर देवाने मला इथेच ‘ऑनलाईन’ कार्यक्रम (कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण) बघण्याची संधी दिली आणि मला पुष्कळ आनंद मिळाला. माझी भावजागृती झाली.
आ. कार्यक्रम पहातांना ‘तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेत आहे’, असे मला वाटत होते. मला तिरुपतीला जाण्याचा योग कधी आला नाही; पण गुरुदेवांमध्ये मला त्याचे दर्शन झाले.’
(समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक : १३.३.२०२४)
समाजाचा सनातनच्या कार्यासंदर्भातील सकारात्मक दृष्टीकोन
‘गोव्यातील म्हाळसाकांत मंदिरात आम्हा सर्वांची अंघोळ आणि अल्पाहार यांची व्यवस्था केली होती. देवस्थानच्या व्यवस्थापनाला त्याचे मूल्य देण्यासाठी काही साधक त्यांच्या कार्यालयात गेले असता व्यवस्थापकांनी ‘‘आम्हाला पैसे नकोत’’, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुमचे कार्य महान आहे. त्यामुळे आम्ही तुमची विनामूल्य सोय करत आहोत.’’
– श्री. नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७६ वर्षे)
|