Ravindra Puri On Sanatan Board : ‘सनातन बोर्ड’ स्थापनेविषयी धर्मसंसदेत निर्णय घेणार ! – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी
प्रयागराज – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ म्हणजे महाकुंभमेळ्याच्या कालावधीत धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी आणि संत या धर्मसंसदेत सहभागी होणार आहेत. या धर्मसंसदेत ‘सनातन बोर्डा’च्या स्थापनेविषयी महत्त्वपूण निर्णय घेतला जाणार आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष म्हणाले की, या धर्मसंसदेत देश-विदेशांतील अनेक संत, विद्वान आणि सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. सर्वांची मते विचारात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे रवींद्र पुरी यांनी सांगितले.