BNP Calls Boycott Indian Products : बांगलादेशातील नेत्याकडून भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन
पत्नीची भारतीय साडी जाळली !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंदुविरोधी ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ पक्षाचे संयुक्त सरचिटणीस रूहुल कबीर रिझवी यांनी येथे भारताचा विरोध म्हणून स्वतःच्या पत्नीची भारतीय साडी जाळली. येथे त्यांनी आंदोलनाच्या वेळी जनतेला भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा आवाहन केले. ‘बांगलादेश कुठल्याही शक्तीसमोर झुकणार नाही, भले मग आम्ही दिवसात एकदाच जेऊ; पण त्यानंतरही आम्ही गर्वाने उभे राहू, आत्मनिर्भर राहू’, असे रिझवी यांनी म्हटले. त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा येथे बांगलादेशाच्या साहाय्यक उच्चायोग कार्यालयाची जमावाने केलेली कथित तोडफोड आणि बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा कथित अवमान केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. ‘ज्या लोकांनी आमचा राष्ट्रध्वज फाडला, त्यांचे कुठलही सामान आम्ही घेणार नाही’, असे रिझवी म्हणाले.
⚠️Bangladesh Nationalist Party (BNP) leader Ruhul Kabir Rizvi calls for a total boycott of Indian Products.
📌The leader went on record to burn his Wife’s Indian saree to show his protest
📌The Interim Government of Bangladesh also plans on removing Sheikh Mujibur Rahman’s… pic.twitter.com/0PAad5ei5F
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 6, 2024
रिझवी यांनी म्हटले की,
१. आम्ही कधी भारतीय झेंड्याचा अपमान करणार नाही; पण आमच्या देशाविरुद्ध चुकीची कृती सहन करणार नाही. बांगलादेशाने याआधीही छळ करणार्यांना पराजित केले आहे.
२. आमच्या माता-भगिनी आता भारतीय साडी परिधान करणार नाहीत. भारतीय साबण, टुथपेस्टही वापरणार नाहीत. मिरची आणि पपई यांचे उत्पादन आम्ही स्वत: करू. आम्हाला भारताच्या सामानाची आवश्यकता नाही. भारताने बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाला दुर्बल करण्याचा प्रयत्न केला आहे.
बांगलादेशी चलनावरील शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र हटवण्यात येणार !
बांगलादेशात चलनी नोटांवरून माजी राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र हटवण्याची सिद्धता चालू आहे. बांगलादेश सेंट्रल बँक ऑगस्ट मासामध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांची छायाचित्रे असलेल्या नवीन नोटा छापत आहे. अंतरिम सरकारच्या सूचनेनुसार २०, १००, ५०० आणि १००० टका (बांगलादेशी चलन) मूल्याच्या नवीन नोटा छापल्या जात आहेत. येत्या ६ महिन्यांत या नोटा बाजारात येणार आहेत.
शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशाचे पहिले राष्ट्रपती होते. १७ एप्रिल १९७१ ते १५ ऑगस्ट १९७५ पर्यंत ते देशाचे पंतप्रधानही होते. बांगलादेशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी शेख मुजीबूर रहमान यांची त्यांच्या घरी हत्या करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|