पी.एम्.आर्.डी.ए.ची अनधिकृत बांधकामावर कारवाई !

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पी.एम्.आर्.डी.ए.ने) अनधिकृत बांधकाम काढून घेण्‍याच्‍या संदर्भात नोटीस दिल्‍यानंतरही बांधकाम चालू ठेवल्‍याप्रकरणी गहुंजे येथील दोघांवर गुन्‍हे नोंद केले आहेत. इंदाराम चौधरी आणि दीपक कुमार सहानी अशी त्‍यांची नावे आहेत. पी.एम्.आर्.डी.ए.चे कनिष्‍ठ अभियंता गणेश जाधव यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. चौधरी, तसेच सहानी यांनी नोटिसीचे पालन न करता ४ मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले होते. आचारसंहितेच्‍या काळात पी.एम्.आर्.डी.ए.च्‍या हद्दीत अनधिकृत बांधकामे झाली होती; मात्र आचारसंहिता संपताच प्रशासनाने या बांधकामावर कारवाई केली आहे. नोटीस देऊनही बांधकाम चालू ठेवल्‍यास गुन्‍हे नोंद केले जात आहेत.

संपादकीय भूमिका

ही भूमिका कायमस्‍वरूपी राहावी.