हिंदू मतदारराजा जागा रहा, हे धर्मयुद्ध संपणारे नाही…!
महाराष्ट्रातील या वर्षीची विधानसभा निवडणूक लढली गेली ती धर्मयुद्ध म्हणूनच ! त्यात महायुतीला अनपेक्षित यश मिळाले. ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले गेलो, तर कापले जाऊ) आणि ‘एक है तो सेफ है’ (एकत्र आहोत, तर सुरक्षित आहोत), या घोषणा अचूक ठरल्या. हिंदू मतदार चक्क भटकायला न जाता, घरी न बसता मतदानाला गेला आणि त्यामुळेच हे शक्य झाले.
१. झोपी गेलेला हिंदू कशामुळे जागा झाला ?
हिंदू हा सतत निद्रिस्त असतो. जेव्हा अगदीच गळ्याशी येते, तेव्हा तो जागा होतो. सध्या देशातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. हिंदु-मुसलमान यांच्यातील तेढ कमालीची वाढली आहे. मुसलमान प्रचंड आक्रमक झाले आहेत. ‘आमची सत्ता आली, तर आम्ही श्रीराममंदिर पाडू’; ‘मोदी-योगी किती दिवस रहातील, नंतर गाठ आमच्याशी आहे’; ‘१५ मिनिटे पोलीस हटवून पहा, अशा ओवैसी, इम्तियाज जलील यांच्या सारख्यांच्या धमक्या’; ‘बुरख्यात राहिलात, तरच सुरक्षित रहाल’ असले बरळणे; अशी विकृत मनोवृत्ती समाजमाध्यमांतून सतत समोर येत होती. त्यातच सज्जाद नोमानी यांच्या ध्वनीफितीत त्यांनी केलेल्या १७ मागण्यांना महाविकास आघाडीने दिलेल्या संमतीने आधीच भडकलेल्या आगीत आणखी तेलच ओतले गेले आणि झोपी गेलेला हिंदू जागा झाला.
याखेरीज महायुतीला यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी. ‘पप्पू’ (काँग्रेसचे खासदार राहुल गांधी) तर काय, भाजपचे ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’च (एखाद्याचा प्रचार करणारी प्रसिद्ध व्यक्ती) आहेत. लोकसभेतील यशानंतर ‘आम्ही केवळ मुसलमान मतांमुळे जिंकून आलो, जय श्रीराम म्हणणारे हरामखोर आहेत, आपला परमपवित्र भगवा ध्वज हे फडके आहे’, असे म्हणणे; उद्धव ठाकरे पक्षाच्या एका विजयी मिरवणुकीत हिंदूंचा भगवा ध्वज खाली रेटत हिरवे झेंडे फडकवण्यामुळे त्यांच्या विरुद्धचा रोष प्रचंड वाढला.
२. भाजपने केवळ हिंदूहित पहावे !
मुख्य म्हणज लोकसभा निवडणुकीत चांगलाच मार खाल्ल्यामुळे भाजपही ग्लानीतून बाहेर आला. दुरावलेला रा.स्व. संघ त्यांच्या जवळ आला. नुसते ‘मोदी है तो मुमकिन है’ (मोदी आहेत, तर सर्व शक्य आहे), असे म्हणून भागणार नाही, तर मतदारांना भेटावे लागेल, हे भाजपला वेळीच उमगले. संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुष्कळ कष्ट घेतले आणि महायुतीला प्रचंड यश मिळाले; पण या यशामुळे भाजपने हुरळून जाऊ नये. कलम ३७० हटवणे (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम), नोटाबंदी, रस्ते बांधणी, सुधारलेले आंतरराष्ट्रीय संबंध, देश-विदेशांत वाढलेली भारताची ख्याती ही त्यांची चांगलीच कामे आहेत; पण केवळ एक चूक सगळ्या चांगल्या कामावर पाणी फिरवते. ही जशी हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई आहे, तशीच भाजपच्याही अस्तित्वाची लढाई आहे. भाजपचे काही निर्णय अनेकांना पटले नव्हते. राज्य शासनानेही मतांसाठी काही चुकीचे निर्णय घेतले, तेही लोकांना पटले नव्हते. तरीसुद्धा हिंदूंनी त्यांना मतदान केले, हे त्यांनी विसरू नये. आता तरी त्यांनी केवळ न केवळ हिंदूहित पहावे.
३. हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता
अर्थात् या यशाचे सर्वाधिक श्रेय द्यायला हवे ते हिंदु मतदारांना; पण आता जागे झालेल्या हिंदूंनी ‘स्वतःचे दायित्व संपले. आता ५ वर्षे काही चिंता नाही’, असे म्हणत पुन्हा झोपी जाऊ नये. या निवडणुकीला ‘धर्मयुद्ध’ म्हटले गेले आहे, ते अगदी योग्य आहे. आता केवळ एक लढाई आपण जिंकली आहे. युद्ध चालूच रहाणार आहे. इस्लामच्या स्थापनेपासूनच ‘दार उल् इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश), हेच मुसलमानांचे लक्ष्य आहे. पाकच्या निर्मितीपासूनच पद्धतशीरपणे ते पावले टाकत आहेत. तुमच्या जागा, भूमी, व्यवसाय ते कह्यात घेत आहेत. भारतातील सर्व हिंदुविरोधी कायदे ही मुसलमानधार्जिण्या काँग्रेसची देण आहे. त्यामुळे काँग्रेसला आणि त्यांच्या समवेतच्या सर्व पक्षांना हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वासाठी सत्तेपासून कायमच दूर ठेवून देशाची सत्ता हिंदुत्वनिष्ठांकडे राहील, याची निश्चिती करणे अत्यावश्यक आहे. हिंदूंच्या अस्तित्वासाठी चालू झालेले हे युद्ध सहज संपणारे नाही. त्यामुळे मोहात अजिबात न पडता कोणताही व्यवहार करतांना वा नातेसंबंध जोडतांना हिंदूंनी काळजी घेणे आवश्यक आहे. ‘फुको, थुको, कुछ भी करो, दो रुपये सस्ता मिला तो भी हिंदू हमसे खरीदेगा’ (फुंका, थुंका, काहीही करा, वस्तू दोन रुपये स्वस्त मिळणार असेल, तर हिंदु आपल्याकडून खरेदी करणार), अशी त्यांनी उघडपणे आपली किंमत केलेली आहे. त्यामुळे जागे व्हा, सावध व्हा ! मतदार राजा कायमच जागा रहा ! पुन्हा झोपी गेला, तर तुझ्या पुढच्या पिढ्याही कायमच्या झोपतील, हे विसरू नकोस !
४. हिंदूंनी भ्रमात न रहाता सतर्क रहाणे महत्त्वाचे !
आता समाजमाध्यमांवर ‘महाराष्ट्राचा गुजरात होईल’, अशा चर्चा चालूही झाल्या, याचे वैषम्य आहे. तुमच्या (हिंदूंच्या) विजयाने तुमचा (हिंदूंचा) शत्रू डिवचला गेला आहे, चवताळला आहे. ‘तो घाबरला आहे’, अशा भ्रमात राहू नका. त्याची पुढची रणनीती ठरलीही असेल. ‘आपण नेहमीप्रमाणे पुन्हा झोपी जाणार आणि आपापसांत भांडत रहाणार’, याचीही त्याला खात्री आहे. त्यामुळेच ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’, हे प्रत्येकाने स्वतःच्या अंतापर्यंत लक्षात ठेवले, तरच स्वतःचे अस्तित्व टिकणार आहे. (२.१२.२०२४)
सौ. मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.