अभिनेता सलमान खान याच्या चित्रीकरणस्थळी घुसून धमकी देणारा कह्यात !
‘बिश्नोईला बोलवू का ?’ अशी दिली धमकी
दादर – येथे अभिनेता सलमान खान याचे एका चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. या वेळी तेथे एक अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचे लक्षात आले. याविषयी तिला विचारल्यावर तिने अरेरावी केली. अज्ञाताला बाहेर जाण्यास सांगितल्यावर त्याने ‘बिश्नोईला संपर्क करून बोलवू का ?’ अशी धमकी दिली. मागील अनेक दिवस गुंड लॉरेन्स बिश्नोई सलमान खान याला धमकी देत आहे. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी अज्ञाताला कह्यात घेतले.