Moradabad Dispute Over Muslim Buying House : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु वसाहतीमध्ये मुसलमानाने घर खरेदी केल्याने हिंदु रहिवाशांचा विरोध
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील एका वसाहतीतील डॉ. बजाज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे घर डॉ. इकरा चौधरी यांना विकल्यामुळे या वसाहतीतील हिंदूंनी संताप व्यक्त करत आंदोलन चालू केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ४५० कुटुंबांमधील सुमारे १ सहस्र ८०० लोक हिंदू आहेत. वसाहत वसवण्याच्या वेळी निर्णय घेण्यात आला होता की, येथे इतर कोणत्याही अन्य धर्मियाची नोंदणी केली जाणार नाही. यानंतरही डॉ. बजाज यांनी मुसलमान समाजातील एका व्यक्तीला स्वःचे घर विकले. विशेष म्हणजे डॉ. बजाज यांच्या शेजार्याने त्यांना घर विकत घेण्याचा प्रस्ताव दिला असतांनाही त्यांनी मुसलमानाला घर विकले.
🚩Hindu residents oppose a Mu$l!m buying house in a Hindu colony in Moradabad, #UttarPradesh
👉Under the freedom of ‘Right to live’, anyone can buy a house anywhere, or anyone can sell a house to anyone in this country. However, considering the current social situation, It is… pic.twitter.com/3sXIV4hSYr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 6, 2024
१. सध्या रहिवाशांचे म्हणणे आहे की, आम्ही या प्रकरणात प्रशासन आणि भाजप आमदार यांच्याशी बोललो आहोत जेणेकरून नोंदणी रहित केली जाईल. तसेच आम्ही घराचे पूर्ण पैसे देऊ; पण अन्य धर्मियाला येथे घर घेऊ देणार नाही.
२. या प्रकरणी मुरादाबादचे जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार सिंह म्हणाले की लोकांनी तक्रार केली आहे की, एका विशिष्ट व्यक्तीने दुसर्या धर्माच्या व्यक्तीला घर विकले आहे. याला नागरिकांचा विरोध होता. हे प्रकरण प्रशासन आणि पोलीस यांना ठाऊक आहे आणि सर्व पक्षांशी चर्चा चालू आहे. प्रत्येकाच्या संमतीने तोडगा निघावा आणि कोणत्याही प्रकारचे वातावरण बिघडू नये, हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व लोकांच्या संपर्कात आहोत आणि सध्या लोक प्रशासनाचे शब्दही स्वीकारत आहेत. मला निश्चिती आहे की, आम्ही लवकरच यावर तोडगा काढू.
संपादकीय भूमिकाया देशात कुणी कुठेही घर खरेदी करू शकतो किंवा कुणी कुणालाही घर विकू शकतो; मात्र सामाजिक स्थितीचा विचार करणे आता आवश्यक आहे. अशा प्रकारचा विरोध का करावा लागत आहे, याचेही चिंतन देशात होणे आवश्यक आहे ! |