China Deploy Troops In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रकल्पांच्या संरक्षणासाठी चीनने तैनात केले ११ सहस्र सैनिक
नवी देहली – चीनकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिक तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे ११ सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताविरुद्धची स्वतःची कमकुवत रणनीती लपवण्यासाठी पाकिस्तानने सुरक्षेच्या नावाखाली चीनचे साहाय्य घेतले आहे. गेल्या काही आठवड्यांत भारताने क्षेपणास्त्रेे आणि ड्रोन यांसह अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांची चाचणी केली आहे. त्यानंतर पाकिस्तानने चीनकडे सहाय्य मागितले.
पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैन्याची तैनाती प्रामुख्याने सीपीईसी (चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) कोहाला उर्जा प्रकल्प आणि आझाद पट्टन जलविद्युत् प्रकल्प यांंच्या संरक्षणासाठी करण्यात आली आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमधील चीनच्या विविध प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणखी सहस्रो सैनिक वाढवण्याची चर्चा आहे.
संपादकीय भूमिकायातून भविष्यात चीन संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिक तैनात करून त्यावर स्वतःचे नियंत्रण मिळवून ते गिळंकृत करेल, यात शंका नाही. त्यापूर्वी भारताने कृती करणे आवश्यक आहे ! |