(म्हणे) ‘बांगलादेशातील उठावाला मान्यता द्या !’ – Bangladesh Student Movement Leader Mahfuz Alam

बांगलादेशातील अंतरिम सरकारमधील विद्यार्थी चळवळीचा नेता महफुज आलम याचे भारताला फुकाचे आवाहन !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात जुलै ते ऑगस्ट या काळात झालेल्या कथित उठावाला अधिकृतपणे मान्यता देण्याचे आवाहन बांगालादेशातील अंतरिम सरकारमधील एक प्रमुख नेता असणारा महफुज आलम याने केले आहे. या हिंसक उठावामुळे पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून पडले. महफुज आलम म्हणाला की, जर भारताने हे बंड मान्य केले, तर दोन्ही देशांमधील संबंध नवीन मार्गाने प्रारंभ होऊ शकतात.

महफुज आलम बांगलादेशाच्या विद्यार्थी चळवळीचा एक प्रमुख सदस्य आहे. त्याने एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, भारताने या उठावाला आतंकवाद, हिंदुविरोध आणि इस्लामी उठाव म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केला. या बंडखोरीकडे दुर्लक्ष करणे बांगलादेशासाठी हानीकारक ठरेल आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल. भारताला आता वर्ष १९७५ च्या कालक्रमातून बाहेर पडून बांगलादेशातील नवीन राजकीय परिस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. हा एक लोकशाही लढा आहे, जो दीर्घकाळ चालू राहील. बांगलादेशात ऐतिहासिक पालटाची वेळ आली आहे. हा लोकशाही मूल्यांसाठीचा लढा आहे.

संपादकीय भूमिका

‘आम्ही हत्या करणार आणि त्याला तुम्ही मान्यता द्या’, असे म्हणण्यासारखेच हे आहे. ही लोकशाहीविरोधी घटना होती आणि ती भारताच्या दृष्टीने नाही, तर जगाच्याही दृष्टीनेही चुकीची आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आवाहनाला भारताने विरोध करत बांगलादेशात लोकशाही व्यवस्था स्थापन करण्यस सांगितले पाहिजे !