B’desh Retd Lt Gen Jahangir Alam : (म्हणे) ‘बांगलादेशात नाही, तर भारतात संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पाठवा !’

बांगलादेशातील अंतरिम सरकारमधील गृहमंत्रालयाच्या सल्लागारांचे विधान

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी

ढाका (बांगलादेश) – संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना बांगलादेशात नव्हे, तर भारतात पाठवली पाहिजे, असे विधान बांगलादेशातील अंतरिम सरकारमधील गृहमंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनी केले. ते बांगलादेशातील नारायणगंज येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांमुळे तेथे संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना तैनात करण्याची मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यावर जहांगीर आलम यांनी वरील विधान केले.

(म्हणे) ‘भारताच्या विरोधात मोर्चे काढा !’ – अंतरिम सरकारचे कायदेशीर सल्लागार असिफ नझरुल

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे कायदेशीर सल्लागार असिफ नझरुल यांनी म्हटले की, आज सर्व राजकीय पक्ष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्ही सर्वांनी बांगलादेशाचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेवर सहमती दर्शवली. भारताच्या बांगलादेशविरोधी प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी मोर्चे, राजकीय परिषद किंवा अगदी सुरक्षा परिषद आयोजित करण्याच्या प्रस्ताव दिला आहे.

संपादकीय भूमिका 

यावरून बांगलादेशी किती उन्मत्त झाले आहेत, हे लक्षात येते ! अशांना सरळ करण्यासाठी भारताने शब्दांची नाही, तर शस्त्रांची भाषाच वापरणे आता आवश्यक झाले आहे. ‘हिंदूंच्या रक्षणासाठी पाकिस्तानला चिरडू न शकणारा भारत बांगलादेशाला, तरी चिरडणार का ?’ असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !