‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !
प्रकल्पाची अचूक कार्यवाही होणार !
मुंबई – भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पहिल्यांदाच ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त झोपडपट्टीचे सर्वेक्षण आणि नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा उद्देश हा प्रकल्पाची कार्यवाही अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षमपणे होणे यांसाठी आहे.
‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त ड्रोन, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग (लिडार) तंत्रज्ञान आणि मोबाईल अॅप्लिकेशन्सचा वापर करून माहिती डिजिटल पद्धतीने गोळा करण्यात येते. नंतर तिचे विश्लेषण केले जाते. यातून धारावीचे आभासी प्रतिरूप माहितीचे सखोल विश्लेषण करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया सुयोग्य करण्यासाठी उपयोगी पडणार आहे, अशी माहिती ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ आणि ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’शी संबंधित अधिकार्याने दिली.