चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अटकेच्या निषेधार्थ सांगली येथे आज धरणे आंदोलन !
सांगली, ४ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशामधील इस्कॉन मंदिराचे चिन्मय कृष्णदास यांना अनधिकृतपणे अटक आणि हिंदूंवर होत असलेले अत्याचार यांच्या निषेधार्थ ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने ५ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता येथील महानगरपालिका समोरील शाळा क्रमांक १ जवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रत्येक हिंदूने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार तथा हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केले आहे.