भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी !

  • चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून आंदोलन !

  • हिंदूंची छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमुखी मागणी

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या आंदोलनात उपस्थित विविध संघटनांचे प्रमुख आणि मान्यवर

कोल्हापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास प्रभु यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. तरी भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने ३ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) या वेळी इस्कॉनसह विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक संघटनांचे १७० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी ह.भ.प. अनिल यादव महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘इस्कॉन’चे श्री. राहुल देशपांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. अभिजित पाटील, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, डॉ. अश्विनी माळकर, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी, श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

उपस्थित संघटना आणि पक्ष

शिवसेना, इस्कॉन, हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘महाराजा प्रतिष्ठान’, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप

उपस्थित मान्यवर – या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. विकास जाधव, श्री. अर्जुन आंबी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. प्रमोद सावंत, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘इस्कॉन’चे प्रमुख श्री. दीपक खोत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, ‘स्वयंसिद्धा’च्या सौ. स्मिता डोंगरकर, ‘श्री’ संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे  यांसह अन्य उपस्थित होते.