‘महावितरण’चे कार्यकारी संचालक सुनील पावडे यांचे निधन !
मुंबई – ‘महावितरण’चे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनील पावडे (वय ५४ वर्षे) यांचे २ डिसेंबरच्या रात्री जळगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळात वर्ष १९९१ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी वीज क्षेत्रातील सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर मुख्य अभियंता म्हणून काम करत असतांना त्यांनी महाराष्ट्राला ‘एक गाव, एक दिवस’ सारखा उपक्रम दिला. मुख्य अभियंता म्हणून त्यांनी बारामती येथे ६ वर्षे काम केले. जुलै २०२४ मध्ये त्यांची कार्यकारी संचालक (प्रकल्प) पदी निवड झाली होती. कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अभियंता अशी त्यांची ओळख होती. त्यांना महावितरणच्या सांघिक कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.