नवी मुंबईत भाडे नाकारणार्या ७१० रिक्शाचालकांवर कारवाई !
नवी मुंबई – नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत भाडे नाकारणार्या ७१० रिक्शाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये वाहतूक विभागाच्या सर्व पोलीस निरीक्षकांना वरील प्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या अंतर्गत वाहतूक शाखांकडून रिक्शाचालकाने प्रवाशाला भाडे नाकारल्याच्या प्रकरणी ७१० खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत. यापुढेही वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून दायित्वशून्यतेने वाहन चालवणार्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे’, असे आवाहन पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.